Happy Birthday Aishwarya Rai - ‘या’ 10 चित्रपटांनी ऐश्वर्या रायला मिळवून दिला सुपरस्टारचा दर्जा
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ऐश्वर्याला सुपरस्टारचा दर्जा मिळवून देणाऱ्या आणि IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊयात.
‘इरुवर’ या तमिळ सिनेमात ऐश्वर्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती भूमिका गाजली होती.
मणि रत्नमच्या ‘गुरु’ या चित्रपटात ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत काम केलं होतं.
‘रेनकोट’ या रितुपर्णो घोष यांच्या सिनेमात ऐश्वर्याने अजय देवगणसोबत काम केलं होतं.
‘पोन्नीयीन सेल्वन’मध्ये ऐश्वर्याने साकारलेलं नंदिनी हे पात्र खूप लोकप्रिय आहे.
‘कन्दुकोन्दाईन कन्दुकोन्दाईन’ हा सांगितिक तमिळ सिनेमा आहे. यातही ऐश्वर्याने काम केलं आहे.
‘देवदास’ मधल्या पारोला तर कुणी विसरुच शकत नाही.
‘जोधा अकबर’ चित्रपटातली ऐश्वर्या आणि ह्रतिकची केमिस्ट्री सगळ्यांना आवडली होती.
‘गुजारिश’ चित्रपटात ऐश्वर्याने थोडीशी हटके भूमिका साकारली होती.
ऐश्वर्याचा ‘खाकी’ चित्रपटातला लूक खूप सुंदर होता.हा सिनेमादेखील गाजला.
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातलं नंदिनी हे पात्र ऐश्वर्याला वेगळी ओळख देऊन गेलं.