मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवारांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिलेय

अजितदादा भाजपामध्ये जाण्याची सुद्धा चर्चा होती

अजित पवार हे भाजपाच्या संपर्कात होते, ते भाजपात जाणार होते, मात्र काकांनी अध्यक्ष व निवृत्तीचा बॉम्ब टाकला आणि दादांचे बंड शमले असं बोललं जातंय

दरम्यान, मध्यंतरी अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्याशी भाजपा प्रवेशाबाबत भेटले होते, अशी चर्चा सुरु आहे

अजित पवारांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे काही आमदार असल्याचं बोललं जातंय, त्यांचा दादा गट भाजपात जाण्यासाठी आग्रही आहे

दरम्यान, पक्षाने सुप्रिया सुळे व पटेलांना जबाबदारी दिली, पण दादांना कोणतीच जबाबदारी दिली नसल्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे

अजित पवारांना शासन, प्रशासनातील कामाचा चांगला अनुभव आहे

यानंतर आता मंत्री केसरकरांनी दादांना खुली ऑफर दिल्यानं चर्चांना उधाण आलं असून, अजितदादा याला कसं उत्तर देतात हे बघावे लागेल