आकाश-श्लोका अंबानीच्या छोट्या मुलीचं झालं नामकरण, मोटा भाय पृथ्वीने जाहीर केले
लहान मुलीचे स्वागत करताना आकाश आणि श्लोका खूप आनंदी आहेत. आता तिचं नामकरण करण्यात आलं आहे.
मोटा भाय पृथ्वीने आपल्या बहिणीचे नाव ठेवले आहे. त्याने तिचे नाव वेदा आकाश अंबानी ठेवले आहे.
अंबानी कुटुंबाच्या वतीने एक घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये आई-वडील, आजी-आजोबा आणि आत्याच्या नावांसह प्रत्येकाच्या नावाचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात जेव्हा 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' लाँच झाले तेव्हा श्लोकाने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी शेअर केली होती.
तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना तिने लेहेंगा-चोली घातली होती, त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीची बातमी आली.
काही दिवसांपूर्वी श्लोका, आकाश अंबानी आणि मुकेश अंबानी, पृथ्वी यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती.
तेथून त्यांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत होते. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनासाठी सर्वजण शुभेच्छा देत होते.
आता अंबानी कुटुंबात छोट्या परीचे आगमन झाल्याने सर्वत्र जल्लोष सुरू आहे.