यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

अखंड ज्योत नवरात्रीत प्रज्वलित करण्यात येते.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती लावण्याचे नियम सांगत आहोत.अखंड ज्योतीचे महत्त्व

पितळ्याच्या दिव्यात अखंड ज्योती लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

अखंड ज्योत विझू नये यासाठी मोठी वात लावावी.

शुद्ध तुपाची अखंड ज्योत प्रज्वलित करावी. मोहरीच्या तेलाचा दिवाही लावू शकता.

नवरात्रीत देवीच्या उजव्या बाजूला तुपाची अखंड ज्योत पेटवावी.

अखंड ज्योत थेट जमिनीवर ठेवू नये. दिवा तांदूळापासून बनवलेल्या टपावर, फळीवर किंवा अष्टकोनावर ठेवावा.