पहिल्या मंगळागौरीसाठी सजल्या पाठकबाई
Photo credit -akshyaddr and hardeek_joshi/instagram
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या मंगळागौरीच्या फोटोंची खूप चर्चा सुरु आहे.
अक्षयाने मंगळागौरीसाठी खास मेहंदी काढली होती.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया पाठकबाई म्हणून आणि हार्दिक राणादा म्हणून लोकप्रिय झाला.
गेल्या वर्षी 2 डिसेंबर रोजी अक्षया आणि हार्दिकने लग्न केलं.
लग्नानंतर अक्षयाची पहिली मंगळागौर साजरी होतेय.
या मंगळागौरीचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते.
मंगळागौरीसाठी अक्षयाने गोल्डन साडी नेसली होती.
हार्दिकनेही गोल्डन ड्रेस घातला होता.दोघांनी उत्साहाने मंगळागौरीचा सण साजरा केला.
फोटो पाहून लक्ष्मी-नारायणासारखा दोघांचा जोडा दिसतोय,अशी कमेंट काही लोकांनी केली आहे.