Published 02 Feb, 2025
By Chetan Bodke
Pic Credit- Zee Marathi Instagram
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील बहिणीच्या हळदी समारंभातील काही खास फोटो अक्षया देवधर हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काही तासांपूर्वीच अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर मालिकेतील खास फोटोज् शेअर केलेले आहेत.
‘झी मराठी’वरील लक्ष्मी निवास मालिकेत भावनाच्या लहान बहिणीचा म्हणजेच जान्हवीचा भव्य विवाह सोहळा सुरू आहे.
भावनाने आपल्या बहिणीच्या जान्हवीच्या लग्न समारंभात लाल रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
अभिनेत्रीने नेसलेल्या साडीवर व्हाईट कलरची भरजरी किनार आहे. या साडीवर अभिनेत्रीने डिझायनर नेकलेस आणि मॅचिंग झुमके वेअर केले.
व्हाईट मण्यांच्या जाड बांगड्या आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा अभिनेत्रीने वेअर केलेला आहे.
अभिनेत्रीने या लूकसाठी केलेली संपूर्ण फॅशन अतिशय सुंदर आहे. तिच्या फॅशनचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमध्ये भावनाची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.
.
दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.
.