अनेक कारणांमुळे तुमची लिव्हर डॅमेज होऊ शकते. फॅटी लिव्हरमुळे स्कार टिश्यू तयार होतात.
जेव्हा स्कार टिश्यू निरोगी टिश्यूची जागा घेतात त्यावेळी लिव्हर काम करणं थांबवतं. यात अल्कोहोलचा मोठा वाटा आहे.
दारूमुळे लिव्हरचे आजार होऊ शकतात. त्यामुळे पोटात जळजळ, थकवा, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.
अल्कोहोलमुळे होणाऱ्या यकृताच्या आजाराच्या सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अल्कोहोलमुळे तुमची लिव्हर किती खराब झाली आहे हे
कळत नाही.
लिव्हरमध्ये फॅट जमायला लागल्यावर लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने फॅट लिव्हरमध्ये जमायला सुरुवात होते.
जर तुम्ही सतत अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर यकृतामध्ये सूज वाढू लागते. यामुळे तुम्हाला अल्कोहोलिक हेपेटायटीसच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
अल्कोहोलच्या सतत सेवनामुळे, लिव्हरमधील चांगल्या टिश्यूंचं नुकसान होतं. याला फायब्रोसिस म्हणतात.अल्कोहोलिक सिरोसिसच्या समस्येला सामोरे जावे लागते.
अति मद्यपान, लठ्ठपणा आणि हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी च्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये लिव्हर खराब होण्याचा धोका जास्त असतो.
कमी प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास हा धोका कमी होऊ शकतो. सीडीसीने सांगितले आहे की महिलांनी दररोज फक्त एक पेय प्यावे आणि पुरुषांनी दररोज 2 पेय प्यावीत.