आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

नुकतेच हे दोघे मनिष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी या दोघांनी घातलेल्या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आलियाने राखाडी रंगाचा लेहंगा घातला होता.

रणवीरने शेरवानी ड्रेस घातला होता.

आलियाच्या लेहंग्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं होतं.

आलियाने गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस घातला होता.

दोघेही नक्षीकाम केलेल्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होते.

आता या दोघांची जोडी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात काय कमाल करणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.