ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये आलिया भट्टचं ग्लॅमरस फोटोशूट
Photo Credit -aliaabhatt/instagram
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट अभिनयासोबतच तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.
ती नेहमी तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आलियाने नुकतंच ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये फोटोशूट केलं. ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिचा हा लूक खूपच ग्लॅमरस आहे.
या गाऊनचा वरचा भाग कॉर्सेट स्टाईल आहे. गाऊनच्या खालच्या भागामध्ये फ्लोरल डिझाइन आहे.
या ड्रेससोबत तिने मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत.
ग्लोइंग मेकअप आणि ओपन मेसी हेअरमुळे तिचा हा लूक परिपूर्ण वाटतोय.
मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन समारंभात तिने हा ड्रेस घातला होता.