आंतराराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आलिया भटने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला होता.
आलियाने शेअर केलेल्या या फोटोने अनेकाचं लक्ष वेधलं.
हार्ट शेपच्या सॉफ्ट टॉयचा फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केला.
कॅप्शनमध्ये आलियाने लिहिले, "माझ्या लहान वुमनने माझ्यासाठी बनवले आहे,तुमच्यासोबत शेअर करते"
आलियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत आलियाला ट्रोल केले आहे.
"राहा इतक्या लहान वयात सॉफ्ट टॉय कसा बनवू शकेल?"असा सवाल यूजर्सनी केलाय.
तर दुसऱ्या यूजरने "राहाला शिवणकाम येतं का?" अशी कमेंट केलेली आहे.
सोशल मीडिया यूजर्सनी केलेल्या या कमेंट्समुळे आलिया ट्रोल झालेली आहे.