अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा २: द रुलची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

पुष्पाच्या हातावर रक्ताच्या थारोळ्या आहेत. एका बोटावर नेल पेंट असा पुष्पाचा लूक दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाल करेल असं म्हटलं जातंय.

याच दिवशी अजय देवगणचा सिंघम 3, कमल हसनचा इंडियन 2 रिलीज होत असल्याचं म्हटलं गेलंय.

त्यामुळे आता पुष्पा 2 याच दिवशी रिलीज करणार की तारीख चेंज करणार पाहुया.

पुष्पा- द राइजने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. अल्लूने पुष्पराजची भूमिका अशा प्रकारे साकारली की पुष्पा एक ब्रॅण्ड झाला.

अल्लूला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.