बदामासोबतच त्याची सालंही तितकीच फायदेशीर असतात.

सालांशिवायचा बदाम पचायला हलका असतो असे म्हटले जाते

बदामाची सालं फेकू नये, बदामाच्या सालांमध्ये खूप पोषक तत्त्व आहेत

बदमाच्या सालांमध्ये विटामिन्स, खनिज, अँटीऑक्सिडंट्स असतात, त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगल्या असतात.

बदामाच्या सालांचा कसा उपयोग करायचा ते जाणून घ्या

अळशी, टरबूजाच्या बियांसोबत दुधाच्या मिश्रणासोबत प्या. यामुळे पोट साफ राहते.

बदामाची साले आणि अंबाडीच्या बिया ब्लेंडरमध्ये बारीक करा. खोबरे, गूळ आणि तूप मिसळून छोटे लाडू बनवा.

तूप, शेंगदाणे, बदामाची सालं, उडीद डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण, इंच, लिंबू हे सगळं मिक्सरमध्ये वाटून चटणी बनवा