सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये शरीराला उत्तम पोषण देणं गरजेचं आहे.
शरीरासाठी अनेक धान्य फायदेशीर आहेत, आज राजगिऱ्याचा फायदा जाणून घेऊया
राजगिरा अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे, भारतात राजगिरा उपवासासाठीही खाल्ला जातो.
व्हिटामिन A, C, E, K, B5, B6, रिबोफ्लॉविन असते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास उपयुक्त
राजगिरा नियमितपणे खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
राजगिऱ्यात असलेलं प्रोटीन रक्तात विरघळत नाही, त्यामुळे डायबिटीज रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर
बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास होणाऱ्यांना राजगिरा खाण्याचा सल्ला दिला जातो.
राजगिऱ्यातील कॅल्शिअम,फॉस्फरस हाडं, दात मजबूत राखण्यास मदत करते.
राजगिरा हदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो.