अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसने आपली प्रेयसी लॉरेन सांचेझ सोबत साखरपुडा केला आहे
बेजोसने सांचेझला 20 कॅरेट हिऱ्यासह हृदयाच्या आकाराची अंगठी दिली
जवळजवळ ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी आता साखरपुडा केला आहे
लॉरेन एक माजी पत्रकार, हेलिकॉप्टर पायलट आणि ब्लॅक ऑप्स एव्हिएशनची संस्थापक आहे.
बेझोसने लॉरेन सांचेझला सुमारे $500 दशलक्ष किंमतीच्या सुपरयॉटवर प्रपोज केलं होतं
या यॉटचे नाव 'कोरू' आहे आणि तिची किंमत सुमारे 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 4 हजार कोटींहून अधिक आहे.
229-फूट तीन महाकाय खांब असलेली ही जगातील सर्वात उंच यॉट आहे.
ही यॉट फक्त सेल पॉवरवर म्हणजेच वाऱ्यावरही धावू शकते. यॉटमध्ये पूल, बार ते लाउंज आणि हॉट टब आहे.
या यॉटमध्ये हेलिकॉप्टरच्या डेकपासून ते डायव्हिंग डेकपर्यंत सर्व काही आहे.
यातील विशेष बाब म्हणजे बेझोसने 4100 कोटींच्या सुपरयाटमध्ये आपल्या मैत्रिणीचा पुतळा बनवला आहे.
२५ वर्ष सोबत असलेली पत्नी मॅकेन्झी स्कॉटपासून बेझोस यांचा घटस्फोट झाला असून त्यांना तीन मुले आणि एक दत्तक मुलगी आहे.
सांचेझने यापूर्वी पॅट्रिक व्हाईटसेलशी लग्न केले होते, तिला दोन मुले आहेत