ॲमेझॉनने श्रीनगरमधील दल सरोवरावर देशातलं पहिलं फ्लोटिंग स्टोअर सुरु केलं आहे.
ॲमेझॉन इंडियाने श्रीनगरमधील दल लेक येथे आपले पहिले फ्लोटिंग ‘आय हॅव स्पेस’ स्टोअर सुरू झाल्याची घोषणा केली आहे.
श्रीनगरमधील मुर्तझा खान हाऊसबोट सेलेक टाऊनचे मालक व चालक आहेत. हाऊसबोटच्या माध्यमातून ते ॲमेझॉनचे ‘आय हॅव स्पेस’ चे पार्टनर म्हणून काम करतील.
मुर्तझा खान दल लेक, निगीन लेकमध्ये आणि त्याच्या अवतीभोवती राहणाऱ्या ॲमेझॉन ग्राहकांना वस्तू पोहोचवण्याचं काम करतील.
सेलेक टाऊन ‘आय हॅव स्पेस’ पत्त्यांच्या यादीत दाखल झाल्याने दल लेक आणि निगीन लेकवर राहणाऱ्या आणि आपले व्यवसाय चालविणाऱ्या शेकडो ग्राहकांची अडचण दूर होणार आहे.
ही दोन्ही ठिकाणं पर्यटकांकडून व स्थानिकांकडूनही सर्वाधिक भेट दिली जाणारी ठिकाणं आहेत.
आतापर्यंत इथल्या ग्राहकांना शिकारा करून या दोन तलावांच्या काठापर्यंत प्रवास करावा लागायचा किंवा आपली पॅकेजेस ताब्यात घेण्यासाठी जवळपासच्या दुकानांवर अवलंबून राहावं लागायचं.
सेलेक टाऊनमुळे मुर्तझा दर दिवशी ही पॅकेजेस सुरक्षितपणे आणि वेळच्यावेळी ग्राहकांच्या हाऊसबोट्सच्या थेट दारापर्यंत नेऊन पोहोचवणार आहेत.
मुर्तझा खान काशी यांनीही अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय.