बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
मुंबईत बिग बींचे 5 बंगले आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
मुंबईतील जुहू येथील जलसा बंगल्यात अमिताभ आपल्या कुटुंबासह राहतात. त्याची किंमत सुमारे 120 कोटी आहे.
नमक हराम,चुपके-चुपके, आनंद, सत्ते पे सत्ता या सिनेमाचं शूटिंग याचं बंगल्यात झालं.
प्रतीक्षा बंगल्याशी बिग बींच्या आठवणी जोडलेल्या आहेत. वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत राहत होते.
याच बंगल्यात ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न झालं होतं.
बिग बींच्या तिसऱ्या बंगल्याचं नाव आहे जनक. इथे ऑफिस आणि जीम आहे.
चौथ्या बंगल्याचं नाव आहे वत्स. हा बंगला सिटी बँकेला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे.
अमिताभ यांच्या पाचव्या बंगल्याला अद्याप कोणतेही नाव देण्यात आलेले नाही.