रजनीकांत आणि अमिताभ बच्चन दोघेही भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत.
या दोघांनी 1991 मध्ये हम या सिनेमात एकत्र काम केलं होतं.
आता पुन्हा एकदा बिग बी आणि रजनीकांत एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे.
हे दोन दिग्गज अभिनेते 32 वर्षांनंतर पुन्हा एकत्र झळकणार आहेत.
या सिनेमाचं नाव 'थलाइवर 170' असल्याचं म्हटलं जात आहे.
रजनीकांत यांचा हा 170 वा सिनेमा असेल.
या सिनेमात अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण सिनेमात दिसणार आहेत.
हा सिनेमा आधी पोनीयिन सेल्वनचा अभिनेता चियान विक्रमला ऑफर करण्यात आला होता.
या बातमीमुळे दोन्ही अभिनेत्यांचे फॅन खूपच खुश आहेत.