तब्बल 22 चित्रपटांमध्ये बिग बींनी केला विजयचा रोल, काय आहे कारण?

शाहरुख खानने अनेक चित्रपटात राहुल हे नाव वापरलं आहे. सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये प्रेम हे पात्र साकारलं आहे. त्याप्रमाणे बिग बींनी अनेक चित्रपटांमध्ये विजय नाव वापरलं आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तब्बल 22 चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या पात्राचं नाव विजय होतं.

अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. अमिताभ यांचे 14 चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर त्यांच्या वाट्याला आला जंजीर आणि सगळं चित्रच बदललं.

जंजीर चित्रपटामुळे अमिताभ रातोरात स्टार झाले. या चित्रपटामध्ये त्यांच्या कॅरेक्टरचं नाव होतं विजय.

बॉलीवूडमध्ये कलाकाराचे सिनेमे ज्या पात्राच्या नावामुळे चालतात ते नाव ते पुढच्या चित्रपटांमध्येही वापरतात. त्यामुळेच कदाचित अमिताभ बच्चन आणि विजय नावाचं एक नातं तयार झालं.

ज्या 22 चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी विजयचा रोल केला आहे त्यामध्ये जंजीर, त्रिशूल, डॉन, द ग्रेट गॅम्बलर, शान, शक्ति, आखरी रास्ता, काला पत्थर, दोस्ताना, अग्नीपथ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी 250पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच 12  चित्रपटांमध्ये त्यांनी डबल रोल केला आहे.

वयाच्या 81 व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आगामी काळात गणपत, कल्की, 2898 एडी, बटरफ्लाय या चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत.