मंगळागौरीसाठी अमृता फडणवीसांचा नऊवारी साज
All Photos Credit - amruta fadnavis/instagram
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी असलेल्या अमृता फडणवीस वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.
नुकतीच त्यांनी एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्या खास नऊवारी साडी नेसल्या होत्या.
नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि पारंपारिक दागिने असा त्यांचा मराठमोळा लूक होता.
या मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्या फुगडीही खेळल्या.
मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांसोबत त्यांनी खूप फोटोही काढले.
या कार्यक्रमात त्या मंगळागौरीच्या इतर खेळांमध्येही सहभागी झाल्या आणि त्यांनी उखाणाही घेतला.
अनेक महिलांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
नऊवारी साडीत त्यांचं सौंदर्य अधिक खुललंय.