नव्या SUV घेण्याचा विचार? Honda Elevate आणि Hyundai Bayonवर ठेवा नजर

Automobile

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ऑक्टोबर 2026 मध्ये SUV सेगमेंटमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. Honda Elevate Facelift आणि Hyundai Bayonच्या एंट्रीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑक्टोबरमध्ये SUVची धूम!

Picture Credit:Honda

Honda Elevate ला पहिला मोठा मिड-सायकल अपडेट मिळणार आहे. Diwali सीझनच्या आधी ही SUV नव्या अवतारात येण्याची अपेक्षा आहे.

Honda Elevate Facelift येतेय

Picture Credit:Honda

नव्या Elevate मध्ये अधिक बोल्ड फ्रंट ग्रिल, स्लीकर LED लाइटिंग आणि नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे.

लूकमध्ये होणार बदल

Picture Credit:Honda

व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अपडेटेड 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay मिळण्याची शक्यता आहे.

केबिनमध्येही अपग्रेड

Picture Credit:Honda

Honda Elevate Facelift मध्ये नवीन डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि अधिक रिफाइन्ड Level 2 ADAS टेक्नॉलॉजी मिळण्याची अपेक्षा आहे.

ADASही होणार अपडेट

Picture Credit:Honda

Elevate मध्ये 1.5-लिटर, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. हे इंजिन 121hp आणि 145Nm टॉर्क देते. मॅन्युअल आणि CVT पर्याय मिळतील.

इंजिनमध्ये मोठा बदल नाही

Picture Credit:Honda

Hyundai Bayon ला Venue आणि आगामी Cretaच्या मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या SUVची लांबी जवळपास 4.3 मीटर असू शकते.

Hyundai Bayonची एंट्री

Picture Credit:hyundai

ड्युअल 12.3-इंच डिस्प्ले, वायरलेस कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंग, Bose ऑडिओ, Level 2 ADAS आणि पॅनोरमिक सनरूफ अशी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

Bayonमध्ये फीचर्सची रेलचेल

Picture Credit:hyundai

Hyundai Bayon मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिनसोबत फॅक्टरी-फिटेड CNG पर्याय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही Hyundaiची 4 मीटरपेक्षा मोठी CNG SUV ठरू शकते.

Bayonचं सर्वात मोठं आकर्षण!

Picture Credit:hyundai