अनंताच्या पूजेसाठी नैवेद्य काय करावा? जाणून घ्या

Lifestyle

24 September 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते. या दिवशी नैवेद्यासाठी कोणते पदार्थ करावेत ते जाणून घेऊया

Picture Credit: Pinterest

हरभरा डाळ, गूळ, वेलची आणि जायफळ वापरून तयार केलेली पुरणपोळी हा पारंपरिक महाराष्ट्रीय गोड पदार्थ आहे. तुपासोबत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता.

पुरणपोळी

Picture Credit: Pinterest

दूध, तांदूळ, साखर, वेलची आणि ड्रायफ्रूट्स वापरून स्वादिष्ट खीर तयार करा. नैवेद्यासाठी हा सोपा आणि पारंपरिक गोड पदार्थ ठरू शकतो.

दुधाची खीर नक्की बनवा

Picture Credit: Pinterest

गोड नैवेद्यासाठी मोदक

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनही केले जाते. त्यामुळे गणपतीला आवडणारे मोदक नैवेद्यात ठेवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. उकडीचे किंवा तळलेले मोदक बनवू शकता.

Picture Credit: Pinterest

झटपट तयार करा श्रीखंड

Picture Credit: Pinterest

घट्ट दही, साखर, वेलची आणि केशर वापरून घरच्या घरी श्रीखंड बनवता येते. पुरीसोबत श्रीखंडाचा नैवेद्यही तयार करू शकता.

सोपा आणि स्वादिष्ट शिरा

Picture Credit: Pinterest

रवा, तूप, साखर, दूध किंवा पाणी आणि वेलची वापरून झटपट शिरा तयार करा. काजू-बदाम घालून त्याची चव आणखी वाढवता येते.

अनंतासाठी सजवा खास नैवेद्य

Picture Credit: Pinterest

पुरणपोळी, खीर, मोदक, श्रीखंड आणि शिरा यापैकी आपल्या घरच्या परंपरेनुसार पदार्थ निवडा. नैवेद्य दाखवून आरती करा आणि प्रसाद सर्वांना वाटा.