कॉलमध्ये बाहेरचा आवाज येतो? ANC की ENC, कोणतं टेक्नॉलॉजी आहे उपयोगी?

Science Technology

13 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आजकाल गर्दीच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर फोनवर बोलताना बाहेरचा आवाज त्रासदायक ठरतो. अशा वेळी ANC आणि ENC या दोन टेक्नॉलॉजी उपयोगी ठरू शकतात. पण दोन्हींचं काम वेगवेगळं आहे.

कॉलमध्ये आवाजाचा त्रास?

Picture Credit: pinterest

ANC म्हणजे Active Noise Cancellation. या टेक्नॉलॉजीचा मुख्य उद्देश कानात ऐकू येणारा बाहेरील आवाज कमी करणे हा आहे. हेडफोन किंवा इअरबड्समधून संगीत ऐकताना याचा विशेष फायदा होतो.

ANC म्हणजे नेमकं काय?

Picture Credit: pinterest

ANC असलेले इअरबड्स मायक्रोफोनच्या मदतीने बाहेरील आवाज टिपतात. त्यानंतर त्याच्या विरुद्ध ध्वनीलहरी तयार करून आवाजाचा परिणाम कमी करतात. बस, ट्रेन किंवा विमानातील सततचा आवाज कमी करण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरते.

ANC कसं काम करतं?

ENC म्हणजे Environmental Noise Cancellation. कॉलदरम्यान तुमच्या आवाजासोबत येणारा आसपासचा अनावश्यक आवाज कमी करून समोरच्या व्यक्तीला तुमचं बोलणं अधिक स्पष्ट ऐकू देण्यावर याचा भर असतो.

ENC म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

ENC असलेल्या इअरबड्समधील मायक्रोफोन आणि ऑडिओ प्रोसेसिंग तंत्रज्ञान तुमचा आवाज व पार्श्वभूमीतील आवाज यांत फरक ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रस्त्यावर, ऑफिसमध्ये किंवा गर्दीत बोलताना कॉलची स्पष्टता सुधारू शकते.

ENC कॉलमध्ये कसं मदत करतं?

Picture Credit: pinterest

ANC: तुम्हाला बाहेरचा आवाज कमी ऐकू यावा यासाठी. ENC: फोनवरील संभाषणात समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू यावा यासाठी.दोन्हींचा उद्देश आवाजाशी संबंधित त्रास कमी करणे हा असला, तरी त्यांचा उपयोग वेगवेगळा आहे.

ANC आणि ENC मधला मुख्य फरक

कॉलसाठी इअरबड्स घेत असाल तर ENC, मायक्रोफोनची गुणवत्ता आणि Noise Reduction फीचर्स तपासा. संगीत ऐकताना बाहेरील आवाज कमी हवा असेल तर ANC महत्त्वाचं ठरू शकतं. दोन्ही फीचर्स असलेले मॉडेलही बाजारात उपलब्ध आहेत. केवळ फीचरच्या नावावर न जाता प्रत्यक्ष कॉल क्वालिटीचे रिव्ह्यू पाहा.

इअरबड्स खरेदी करताना काय पाहाल?

प्रवासात संगीत ऐकताना बाहेरचा आवाज कमी हवा असेल तर ANC उपयोगी. तर गर्दीत फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज स्पष्ट ऐकू यावा, यासाठी ENC महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे इअरबड्स निवडताना तुमचा वापर आधी ठरवा.

तुमच्यासाठी कोणतं टेक्नॉलॉजी योग्य?