बॅटरी, झूम आणि प्रोसेसरमध्ये कोण पुढे? Motorola Signature 27 vs iPhone 18 Pro Max तुलना!

Science Technology

08 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Motorola Signature 27 मध्ये 6.8 इंचांचा Extreme AMOLED Duo डिस्प्ले मिळतो. तर iPhone 18 Pro Max मध्ये 6.9 इंचांचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे. दोन्ही फोन मोठ्या आणि प्रीमियम स्क्रीनचा अनुभव देतात.

डिस्प्ले कोणाचा भारी?

Picture Credit:apple

Motorola Signature 27 मध्ये Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 चिपसेट आहे. तर iPhone 18 Pro Max मध्ये Apple A20 Pro प्रोसेसर देण्यात आला आहे. Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील हे हाय-एंड प्रोसेसर आहेत.

प्रोसेसरमध्ये कोण पुढे?

Picture Credit:motorola

Motorola मध्ये 50MP मुख्य, 50MP अल्ट्रावाइड आणि 200MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. iPhone 18 Pro Max मध्ये 48MP व्हेरिएबल अपर्चर मुख्य, 48MP अल्ट्रावाइड आणि 48MP टेलिफोटो कॅमेरा मिळतो.

कॅमेरा सेटअपमध्ये मोठा फरक!

Picture Credit:motorola

Motorola Signature 27 मध्ये 3.5x ऑप्टिकल झूम आणि AI च्या मदतीने 100x Super Zoom Pro मिळतो. iPhone 18 Pro Max मध्ये 4x ऑप्टिकल टेलिफोटो आणि 40x पर्यंत झूमचा पर्याय आहे. दूरच्या वस्तूंचे फोटो काढण्यासाठी दोन्ही फोन वेगवेगळे पर्याय देतात.

झूम फोटोग्राफी कोणाची भारी?

Picture Credit:apple

Motorola Signature 27 मध्ये 7,000mAh बॅटरी, 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग मिळते. iPhone 18 Pro Max मध्ये 45 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅकचा दावा आहे. मात्र दोन्ही कंपन्यांच्या बॅटरी टेस्टचे मापदंड वेगवेगळे आहेत.

बॅटरी आणि चार्जिंगमध्ये कोण पुढे?

Picture Credit:apple

Motorola Signature 27 मध्ये Android 17 आणि Google Gemini Intelligence मिळते. तर iPhone 18 Pro Max मध्ये iOS 27 आणि Apple Intelligence फीचर्स आहेत. कस्टमायझेशन आणि Android इकोसिस्टम हवी असल्यास Motorola, तर Apple इकोसिस्टम आवडत असल्यास iPhone चांगला पर्याय ठरू शकतो.

Android की iOS?

Picture Credit:motorola

Motorola Signature 27 मध्ये IP68 आणि IP69 रेटिंगसह Gorilla Glass Ceramic 3 प्रोटेक्शन मिळते. iPhone 18 Pro Max मध्ये IP68 रेटिंग आणि Ceramic Shield 2 प्रोटेक्शन आहे. दोन्ही फोन प्रीमियम डिझाइनसह येतात.

डिझाइन आणि टिकाऊपणा

Picture Credit:motorola

जास्त बॅटरी क्षमता, फास्ट चार्जिंग, 200MP झूम कॅमेरा आणि Android अनुभव हवा असेल तर Motorola Signature 27 आकर्षक पर्याय आहे. तर iOS, Apple इकोसिस्टम, व्हिडिओ प्लेबॅक आणि Apple Intelligence ला प्राधान्य देणाऱ्यांसाठी iPhone 18 Pro Max योग्य ठरू शकतो.

कोणता स्मार्टफोन खरेदी करावा?

Picture Credit:apple