हिंदू धर्मात अशा अनेक प्राण्यांचा उल्लेख आहे, ज्यांचे घरात येणे शुभ मानले जाते.
पोपटाचा संबंध कुबेराशी असल्याचा समज आहे. त्यामुळे पोपट घरात असणे शुभ मानले जाते.
पोपट हे कामदेवाचेही वाहन आहे, त्यामुळे ते शुभ प्रतीक मानले जाते.
पोपट देखील बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार बुध ग्रह वैभवाचे प्रतीक आहे.
वास्तूशास्त्रानुसार कासवामुळे घरात सकारात्मकता येते, त्यामुळे घरात कासव असणे शुभ मानतात.
घरात कासवाचे आगमन हे लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. त्यातून समृद्धी आणि सुख-शांती येते.
काळ्या मुंग्या शनि देवाशी संबंधित असल्याचं मानलं जातं.
काळ्या मुंग्या घरात आल्यास घरात सुख-समृद्धी येते असं मानलं जातं.
काळ्या मुंग्या घरात अंडी घेऊन येत असतील तर ते शुभ मानले जाते.