राजस्थानहून पाकिस्तानला गेलेल्या अंजूने नसरुल्लासोबत लग्न केल्याची बातमी आली. 

 नसरुल्ला आणि अंजूने अफवा म्हटलंय तर पाकिस्तानी पोलिसांनी लग्नाला दुजोरा दिलाय.

त्यांच्या लग्नाचा करार आधीच व्हायरल झाला . आता प्री वेडिंगचा व्हिडिओही समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये अंजू नसरुल्लाहचा हात धरून फिरताना दिसत आहे, हा व्हिडिओ प्रीवेडिंगचा नसल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये अंजूने सूट घातला आहे. तर नसरुल्लाने कुर्ता, पायजमा आणि टोपी घातली आहे.

व्हिडिओ प्रोफेशनली शूट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला अंजू वेड्स नसरुल्ला असेही लिहिले आहे.

अंजूने सांगितले की, एका व्लॉगरने तिचा हा व्हिडिओ बनवला आहे.

 ती म्हणाली की ती पाकिस्तानात फिरण्यासाठी गेली आहे. नसरुल्लाशी लग्नाचा विचार नाही. 

नसरुल्लाने सांगितले की त्याचे अंजूवर प्रेम आहे, पण त्यांनी लग्न केलेले नाही.