अंकुश चौधरी महादेव या सिनेमातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं.
या पोस्टरमध्ये अंकुश चौधरीच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध दिसत आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं.
महादेव या सिनेमात एक्शन, फॅण्टसी आणि ड्रामा पाहायला मिळेल.
अंकुश चौधरीने आजवरच्या कारकिर्दीत अशी भूमिका साकारलेली नाही.
अंकुश चौधरीची ही भूमिका एकदम हटके आहे.
आता अंकुशचा हा अंदाज प्रेक्षकांना आवडतो का याची उत्सुकता.