‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी नर्गिस फाखरी ओटीटी क्षेत्रात पाऊल ठेवतेय.
‘तत्लुबाज’ या वेब सीरिजमधून नर्गिस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ओटीटीवर काम करताना नर्गिसने स्वत:ला काही मर्यादा घातल्या आहेत.
ओटीटीवर जरी काम करणार असले तरी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न होणार नाही, असं नर्गिसने सांगितलं आहे.
मला नग्नता हा विषय आवडत नाही,असं तिने सांगितलं.
पण लैंगिकतेवर भाष्य करणाऱ्या पात्राची भूमिका साकारायला मला संकोच वाटणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं.
ओटीटीवर वेगवेगळ्या भूमिका निभावण्यासाठी नर्गिस उत्सुक आहे.
मला भूमिकांमध्ये तोचतोचपणा नकोय, पात्रांचं वैविध्य अनुभवायचं आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली.
वेगवेगळ्या भूमिकांच्या शोधात असलेली नर्गिस नर्गिस ‘तत्लुबाज’ वेब सीरिज व्यतिरिक्त ‘हरि हर वीरा मल्लू’ चित्रपटात दिसणार आहे.