अनुप्रियाचा डिझायनर ड्रेस बघून नेटकरी हैराण
Photo Credit - goenkaanupriya/instagram
अभिनेत्री अनुप्रिया गोएंका ‘सुल्तान ऑफ दिल्ली’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये ती शंकरी देवी हे पात्र साकारत आहे
‘सुल्तान ऑफ दिल्ली’ वेबसीरिजच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात अनुप्रियाने एक ब्ल्यू डिझायनर ड्रेस घातला होता.
तिचा हा ड्रेस पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. तिला सध्या ट्रोल केलं जातंय.
अनुप्रिया या डिझायनर ब्ल्यू ड्रेसमध्ये ग्लॅमरस तर दिसतेय पण तिच्यावर खूप टीका होतेय.
‘लेबल डी’ चा हा डिझायनर ड्रेस असल्याचं अनुप्रियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘तू नक्की घातलंय तरी काय ?’ असा प्रश्न तिच्या या ड्रेसमधल्या फोटोवर नेटकऱ्यांनी विचारला आहे.
तिचा हा ड्रेस इंडो-वेस्टर्न स्टाईलचं विचित्र कॉम्बिनेशन असल्याचं काहींनी म्हटलं आहे.
तिच्या या ड्रेसचं फार कौतुक होत नसलं तरी तिच्या शंकरी देवी या पात्राचं खूप कौतुक होतंय.