₹2.49 लाखांत Apache 310 चा नवा Black Diamond Edition; काय खास आहे?

Automobile

17 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

TVS ने Apache RTR 310 आणि Apache RR 310 साठी Black Diamond Edition आणले आहे. नव्या एडिशनमध्ये बाइकचा लूक अधिक स्टायलिश आणि प्रीमियम करण्यात आला आहे.

Apache 310 चा नवा अवतार

Picture Credit:tvsmotor

Apache RTR 310 Black Diamond: ₹2,48,990 Apache RR 310 Black Diamond: ₹2,87,790 या एक्स-शोरूम किमती आहेत.

किंमत किती?

Picture Credit:tvsmotor

Black Diamond Editionमध्ये दोन्ही बाइक्सना डार्क आणि प्रीमियम फिनिश देण्यात आली आहे. त्यामुळे नेहमीच्या मॉडेलपेक्षा हा अवतार अधिक आक्रमक दिसतो.

ऑल-ब्लॅक थीम

Picture Credit:tvsmotor

नवीन एडिशन हे बाइक्सच्या टॉप व्हेरिएंट आणि क्विकशिफ्टर सेटअपवर आधारित आहे. त्यामुळे परफॉर्मन्स-संबंधित महत्त्वाची उपकरणे कायम ठेवण्यात आली आहेत.

टॉप व्हेरिएंटवर आधारित

Picture Credit:tvsmotor

या एडिशनचा मुख्य भर डिझाइनवर आहे. इंजिन किंवा प्रमुख मेकॅनिकल सेटअपमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही.

इंजिनमध्ये बदल नाही

Picture Credit:tvsmotor

Apache RR 310 Black Diamond Editionचे एक खास आकर्षण म्हणजे Keyless Ride Technology. हे फीचर RTR 310 मध्ये आधीपासून उपलब्ध आहे.

RR 310 मध्ये Keyless फीचर

Picture Credit:tvsmotor

Apache 310 सीरिजमध्ये Cornering ABS, Traction Control, Cruise Control, Launch Control आणि Drag Torque Control यांसारखी इलेक्ट्रॉनिक फीचर्स मिळतात.

फीचर्सही दमदार

Picture Credit:tvsmotor

RTR 310 ही नेकेड स्ट्रीट बाइक पसंत करणाऱ्यांसाठी, तर RR 310 ही फुली-फेयर्ड स्पोर्टी डिझाइन आवडणाऱ्यांसाठी आहे. Black Diamond Editionमुळे दोन्हींना वेगळा प्रीमियम टच मिळतो.

कोणासाठी कोणती?

Picture Credit:tvsmotor

Black Diamond Editionची उपलब्धता 17 सप्टेंबरपासून TVS डीलरशिपवर सुरू झाली आहे. नवीन लूकमध्ये Apache 310 घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

बुकिंग/खरेदी सुरू

Picture Credit:tvsmotor