माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे.
कलाम यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांची काही प्रेरणादायी वाक्ये जाणून घेऊयात.
कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.
जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.
स्वप्नं ती नसतात जी आपण झोपल्यावर पाहतो, स्वप्नं ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत.
निपुणता ही एक सतत करण्याची प्रक्रिया असते, तो अपघात नसतो.
पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.
सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.
आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.