Apple 'वंडरलस्ट' इव्हेंट आयोजित करण्यात आलाय. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 10.30 वा. हा इव्हेंट सुरू होईल
या इव्हेंटमध्ये नवीन iphone launch केले जातील, नवीन प्रॉडक्ट्स लाँच केली जातील.
सोशल मीडिया अकाउंटवर हा इव्हेंट लाईव्ह दाखवण्यात येईल.
Appleचे 5 हँडसेट लॉन्च होऊ शकतात, iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आणि iPhone 15 Pro Max Ultra असू शकतात.
Apple या इव्हेंटमध्ये वॉच सीरीज 9, सेकंड-जेन वॉच अल्ट्रा आणि एअरपॉड्स USB टाइप सी पोर्टसह सादर करण्यात येईल.
iPhone 15 मध्ये action बटणापासून USB Type C पोर्टपर्यंत अनेक बदल पाहिले जाऊ शकतात.
टायटॅनियम फ्रेम, कस्टमाइज Action बटणे आणि A17 बायोनिक चिपसेट व्यतिरिक्त, नव्या सीरिजमध्ये Wi-Fi 6E दिसेल.
टायटॅनियम फ्रेममुळे,iphone 15 मॉडेल गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या iphone 14 प्रो पेक्षा 10 टक्के वजनाने हलके असतील.
रिपोर्ट्सनुसार, iPhone 15 Pro ची किंमत $100 अधिक असू शकते, त्यामुळे त्याची सुरुवातीची किंमत US $1,099 (सुमारे 81,200 रुपये) असू शकते.