अभिनेता अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस आहे.

 मलायकासोबतच्या नात्यामुळे अर्जुन नेहमी चर्चेत असतो. पण आज त्याच्या वाढदिवसामुळे त्याच्या चित्रपटांची चर्चा सुरु आहे.

अर्जुन कपूरच्या काही चित्रपटांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

 ‘इशकजादे’ या 2012 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामधून अर्जुननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 ‘गुंडे’ हा चित्रपट 2014 ला प्रदर्शित झाला. यात अर्जुननं साकारलेली बाला ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

‘की अँड का’ या 2016 मध्ये आलेल्या चित्रपटातील अर्जुन आणि करिना कपूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  

 ‘2 स्टेट्स’ या चित्रपटामधील अर्जुनच्या अभिनयाची अनेकांनी स्तुती केली.

‘पानिपत’ चित्रपटात अर्जुनने ऐतिहासिक भूमिका साकारली होती.

 अर्जुनचा  ‘कुत्ते’ हा चित्रपट 2023 ला रिलीज झाला. अर्जुननं या चित्रपटामध्ये गोपाळ हे पात्र साकारलंय.

 ‘अर्जुन’ च्या पुढच्या चित्रपटाची चाहते आता वाट बघतायत.