मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बर्लिनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. 

अर्जुन कपूरने  मलायका अरोरासोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघेही सध्या युरोपमध्ये सुट्टी घालवत आहेत.

दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत.

दोघेही बर्लिनमध्ये फिरत आहेत आणि फोटो अपलोड करत आहेत.  अनेक ठिकाणचे सेल्फीही अर्जुन कपूरने अपलोड केले आहेत

अर्जुन कपूरच्या फोटोंवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने 'लव्ह बर्ड' असे लिहिले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, 'love.'

मलायकाने अर्जुनच्या फोटोंवर कमेंट करत, रेड हार्ट आणि ब्लॅक हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

मलायका अरोराने अर्जुन कपूरला डेट करण्यापूर्वी अरबाज खानला घटस्फोट दिला होता. 

मलायका अरोरा अर्जुन कपूरपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 2023 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.