अर्जुन रामपाल वयाच्या पन्नासाव्या वर्षी चौथ्यांदा बाबा झाला आहे.
अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी गुरुवारी दुसऱ्या मुलाचं स्वागत केलं.
या दोघांना आधी एक मुलगा आहे. त्याचं नाव अरिक असून तो नुकताच चार वर्षांचा झाला आहे.
अर्जुन आणि त्याची पहिली पत्नी मेहर जेसिया यांच्या दोन मुली आहेत.
अर्जुनने इन्स्टाग्रामवर नव्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे.
विनी-द-पूहसोबत ‘हॅलो वर्ल्ड’ छापलेल्या टॉवेलचा फोटो शेअर करत त्याने ही बातमी दिली आहे.
मेहरपासून वेगळं झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलाला 2018 मध्ये भेटला. काही महिन्यांनी त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना मुलगा झाला.
अर्जुन शेवटचा कंगना रनौत सोबत ‘धाकड’ मध्ये दिसला होता.
अर्जुन आता बॉबी देओलसोबत अब्बास मस्तानच्या आगामी ‘पेंटहाउस’ चित्रपटात दिसणार आहे.