महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दादूस म्हणजेच अरुण कदम लवकरच आजोबा होणार आहेत.

काही दिवसांपुर्वीच त्यांच्या लेकीचं डोहाळ जेवण पार पडलं.

आता अरुण कदम यांची मुलगी सुकन्या कदम हिने मॅटर्निटी फोटोशूट केलंय.

सुकन्या कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक्स डिझायनर आहे. तिने भरतनाट्यम या नृत्यप्रकाराचंही शिक्षण घेतलंय.

सुकन्या कदम आणि तिचा नवरा सागर पोवाळे यांनी पारंपरिक वेशात हे फोटोशूट केलंय.

नऊवारी साडी, गळ्यात साधं मंगळसूत्र, पायात कोल्हापुरी चप्पल असा सुकन्याचा लूक आहे.

 धोती, सदरा, त्यावर काळा कोट आणि टोपी असा सागरचा लूक आहे.

पाऊस सुरु असताना हे फोटोशूट करण्यात आलंय.

मुंबईत बँड स्टँडवर करण्यात आलेल्या या फोटोशूटमध्ये सुकन्या आणि सागर दोघंही खूप छान दिसतायत.

फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम