गायिका आर्या आंबेकर तिच्या गोड आवाजामुळे तर लोकप्रिय आहेच पण तिच्या सौंदर्याचंही कायम कौतुक होत असतं.
‘संगीत संयुक्त मानापमान’ या नाटकासाठी आर्याने खास ट्रॅडिशनल लूक केला होता.
नऊवारी साडी, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा तिचा मराठमोळा लूक होता.
‘संगीत संयुक्त मानापमान’ या संगीत नाटकामध्ये आर्यासोबत गायक राहुल देशपांडेही आहे.
राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर अनेकदा एकत्र गायनाचे कार्यक्रमही करत असतात.
गायनासोबतच आर्याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात अभिनयही केला आहे.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शो मुळे आर्या सगळ्यात आधी प्रसिद्धीच्या झोतात आली.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’नंतर तिचा गायन क्षेत्रातील प्रवास अविरतपणे सुरु आहे.
सध्या तिचा ‘संगीत संयुक्त मानापमान’ नाटकातील मराठमोळा लूक पाहून चाहते तिचं कौतुक करतायत.