नव्वदीतही रोज रियाज करणाऱ्या मेलडी क्वीनचं फिटनेस सिक्रेट

  गायिका आशा भोसले आज नव्वद वर्षांच्या झाल्या.

नव्वदीतही त्या रोज गाण्याचा रियाज करतात आणि फिट आहेत.

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य लोकांना सांगितलं.

आशाजी सांगतात की, जो माणूस आपलं वय डोक्यात ठेऊन चालतो म्हातारा होतो. मी अजुनही स्वत:ला 40 पेक्षा जास्त वयाची समजत नाही.

नातवंडांना बघितल्यानंतर जाणवतं की खूप काळ निघून गेलाय. पण मी  माझं काम थांबवत नाही,असं आशाजी सांगतात.

 मी स्वत:ला कामात मग्न ठेवते. जेवणं बनवणं,गाण्याचा रियाज करणं, फिरणं हे सगळं मी सुरु ठेवलं असल्याचं त्या आवर्जून सांगतात.

मी परफॉर्म करते तेव्हा लोकांचं पूर्ण मनोरंजन झालं पाहिजे ही गोष्ट ध्यानात ठेवते आणि गाण्यासाठी उभी राहते, असं त्या सांगतात.

जर मला पुढे संधी मिळाली तर मी गाणं गात राहणार आणि जोक्सही मारत राहणार, असं आशाजी सांगतात.