एशिया कप 2023 च्या सुपर 4 च्या मॅचेस सध्या सुरू आहेत. 

प्रेमदासा स्टेडिअमवर भारत-पाकिस्तान यांच्यात लढत सुरू आहे

या मॅचमध्ये विराट कोहलीने 94 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी केली. 9 चौकार आणि तीन षटकार मारले.

 कोहलीने शुभमन गिलच्या शैलीत सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्कानेही त्याच्या शतकावर प्रतिक्रिया दिली. अनुष्काने इंस्टाग्रामवर लिहिले, 'शानदार खेळी, अद्भुत व्यक्ती.'

कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.

कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकरने 321 डावात 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

ही कामगिरी करण्यासाठी विराट कोहलीला केवळ 267 डावांचा अवधी लागला.