टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून एशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले.
एशिया कप चॅम्पियन बनल्यावर, भारताला रोख बक्षीस म्हणून अंदाजे 1.24 कोटी रुपये (1 लाख 50 हजार डॉलर) मिळाले.
उपविजेत्या श्रीलंकेच्या संघाला अंदाजे 62 लाख 31हजार रुपये (75 हजार डॉलर) मिळाले.
फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच सिराजला 5 हजार डॉलर (सुमारे 4 लाख 15 हजार रुपये) मिळाले.
कुलदीप यादव सीरिजमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला 12 लाख 46 हजार रुपये (15 हजार डॉलर) मिळाले.
श्रीलंका क्रिकेटच्या ग्राउंड स्टाफला 50 हजार डॉलर्स (सुमारे 41.54 लाख रुपये) रोख बक्षीस देण्यात आले.
भारतीय संघाने आठव्यांदा एशिया कप विजेतेपद पटकावले आहे.