गर्भगृहात रामाच्या बालरुपाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या मूर्तीचे लोकार्पण करतील

मंदिरात नृत्य मंडप, रंगमंडप, संमेलन मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप असतील.

मंदिरात प्रभू राम आणि त्यांच्या सर्व भावांचे दर्शनही पर्यटकांना करता येणार आहे.

खांबांवर 9 हजार 800 शिल्पे असतील तर भिंतींवर 10 हजारांहून अधिक शिल्पे असल्याची माहिती आहे.

राम मंदिराच्या उभारणीत वापरण्यात आलेल्या विटांवर 'श्री राम' लिहिलेले आहे.

मंदिराची लांबी 360 फूट, रुंदी 235 फूट आणि उंची 161 फूट आहे.

राम मंदिराच्या सिंहद्वारमध्ये हत्ती आणि सिंहांच्या मूर्ती असतील

राम मंदिराच्या दक्षिण-पश्चिम भागात कुबेरच्या टेकडीवर शिवमंदिर आहे.

23 जानेवारीपासून राम मंदिर जनतेला दर्शनासाठी खुले होणार आहे.