‘ड्रीम गर्ल’ चा सीक्वेल ‘ड्रीम गर्ल-2’ या चित्रपटात आयुष्मान खुराना पूजाच्या म्हणजेच एका मुलीच्या रोलमध्ये दिसणार आहे.
नुकताच ‘ड्रीम गर्ल -2’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.
या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहून आयुष्मानने आनंद व्यक्त केलाय.
‘ड्रीम गर्ल’ तर ब्लॉकबस्टर ठरला. सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ‘ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटत असल्याचं त्याने सांगितलं.
एखाद्या मुलीच्या वेशात सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती ,असं तो म्हणाला.
एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते, असं त्याने सांगितलं.
मुलीची भूमिका करण्याची प्रेरणा गोविंदा आणि कमल हसनकडून मिळाल्याचं आयुष्मान सांगतो.
या भूमिकेसाठी आयुष्मानने वजनही कमी केलंय.
‘ड्रीम गर्ल 2’ हा 25 ऑगस्ट रोजी चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. आयुष्मानच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.