मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी या दोन्ही क्षेत्रामध्ये निळू फुलेंनी आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, या प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या असल्या तरी देखील 'खलनायक' म्हणून ते ठळकपणे आपल्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत.

 त्यांनी साकारलेला ’खलनायक ’ एवढा जिवंत वाटायचा की स्त्री वर्ग तर अक्षरशः त्यांच्या नावाने बोटं मोडायचा.

राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून निळू भाऊंच्या अभिनयाला चार चाँद लागले. ’कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटयातून त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले.

त्यानंतर ’पुढारी पाहिजे’ ’बिन बियांचे झाड’ या लोकनाटयांतून त्यांच्या अभिनयाला नवा आयाम मिळाला.

सिंहासन, पिंजरा, एक गाव बारा भानगडी, सामना, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

त्यांच्यातला खलनायक जनमानसात एवढा खोलवर रूजला होता की सहज म्हणून देखील ते एखाद्या गावात गेले तरी आया बाया त्यांच्या नावाने बोटं मोडीत असत.

'मी मला हवे तसेच कपडे घालते' - बिकिनी गर्ल