नवरात्रात उपवास केला असल्यास कोणती पेय प्यावीत हे जाणून घेऊयात.
उपवासादरम्यान ऊर्जा कायम राखण्यासाठी बनाना बदाम शेकचे सेवन तुम्ही करू शकता.
नवरात्रात शरीरात ऊर्जा राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सेवन देखील करू शकता.
याचे सेवन केल्याने शरीरात थंडावा राहतो. तसेच दिवसभर ताजेतवाने असल्यासारखे वाटते.
दही-फ्रूट स्मूदी ही मिनरल आणि प्रोटिन्सने भरलेली असते. त्यामुळे याचे सेवन तुम्ही करू शकता.
तुम्ही या कालावधीत पुदिना घातलेले ताक देखील पिऊ शकता. यामुळे आपले पचन देखील नीट होते.