नोव्हेंबर महिना हा सणांचा महिना आहे.

सणांच्या दिवसांत बँका बंद असणार, त्यामुळे बँकेची कामं लवकरात लवकर उरका.

महिन्यातील चारही रविवारी बँका बंद राहतील. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील

दिवाळीच्या निमित्ताने 13, 14 आणि 15 तारखेला बँका बंद राहतील

मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, या दिवशी मध्य प्रदेशातील बँकांना सुट्टी असेल.

छठ पूजाही याच महिन्यात येणार आहे. 20 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी असेल

गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी बँका बंद राहतील.