बेडरुममधील तुमचा बेड दक्षिण, पश्चिम दिशेला आहे, मास्टर बेडरुम घराच्या नैऋत्य कोनापर्यंत असावी.
वास्तूशास्त्रानुसार लायटिंग बेडच्या दक्षिण किंवा पश्चिम भींतीवर असावे.
बेड खोलीच्या मध्यभागी ठेवा जेणेकरून फिरण्यासाठी पुरेशी जागा असेल आणि सकारात्मक ऊर्जा राहील
झोपताना व्यक्तीचे तोंड दक्षिणेकडे असावे त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
बेडरूमचा रंग ऑफ-व्हाइट, क्रीम, स्काय ब्लू, हिरवा, जांभळा किंवा गुलाबी असावा.
आरसा कधीही बेडच्या समोरच्या दिशेला लावू नका, झोपलेले प्रतिबिंब पाहणे शुभ नाही.
टीव्ही बेडरुममध्ये ठेवणे टाळावे त्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
मनी प्लांट, बांबू प्लांट, लिली प्लांट, लॅव्हेंडर प्लांटसारखी रोपे बेडरुममध्ये ठेवावी.
तुटलेली पेंटिंग, तुटलेले सामान, देवाच्या फ्रेम्स बेडरुममध्ये ठेवू नका.