विवाहित पुरुषासोबत नात्यात असलेल्या स्त्रीला कायमच कमीपणाची भावना मनात असते. अशावेळी नात्यातील गुंतागुंतीमुळे मानसिक स्थैर्य ढासळते.

अफेअर केल्यामुळे सतत अपराधीपणाची भावना मनात असते. आयुष्यातील इतर गोष्टींबद्दलचा दोषही त्या सतत स्वत:कडे घेतात.

या स्त्रीयांच्या स्वाभिमानालाही फटका बसतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.

नातेसंबंधातील 'दुसरी स्त्री' जीवनात unpredictable निर्णय घेण्यास प्रवृत्त होते. अफेअरबद्दल त्यांना खात्री नसते.

एकटेपणाची भावना सतत मनात असते. नात्यात असल्याचा आनंद त्या कधीच व्यक्त करू शकत नाहीत.

भविष्याबद्दल त्यांना सतत काळजी वाटत असते.

या स्त्रीया कधीही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत. आपला कायम विश्वासघातच होईल ही भावना कायम त्यांच्या मनात असते.

आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळी त्यांची क्षमात कमी पडते. निर्णय घेताना त्या डळमळतात.

या स्त्रीयांचे मानसिक स्थैर्य कधीच संतुलित नसते. दैनंदिन काम करतानाही त्यांना दबाव, असुरक्षिततेची भावना जाणवते. 

 विवाहित पुरुषाशी संबंध ठेवण्याऱ्या या स्त्रीकडे समाज खूप तुच्छतेने पाहतो.