स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांच्या घटकांपैकी तमालपत्र हा खूप महत्त्वाचा घटक आहे.
तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे ते भाज्यांमध्ये वापरलं जातं.
दोन कप पाण्यात दोन लहान तमालपत्राची पानं आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर टाका. चार ते पाच मिनिटे ते उकळवा. गॅस बंद करुन काही मिनिटे ते झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून त्यात लिंबू किंवा मध मिसळून प्या. हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तमालपत्राच्या चहामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते.
रक्तातील कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी तमालपत्र उपयुक्त ठरते.