राजगिरा कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात.
राजगिऱ्याच्या लाह्या पचण्यास अत्यंत हलक्या आणि शरीरासाठी पौष्टिक असतात. राजगिऱ्यापासून लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा असे पदार्थही तयार करण्यात येतात.
राजगिऱ्याचा डाएटमध्ये समावेश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.
राजगिऱ्याचा रोज आहारात सामवेश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. यातील लायसिनमुळे केस दाट होतात. राजगिऱ्यातील सिस्टीनमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
राजगिऱ्यात असलेलं प्रोटीन रक्तात विरघळत नाही, त्यामुळे डायबिटीज रुग्णांसाठी राजगिरा फायदेशीरआहे.
बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास होणाऱ्यांना राजगिरा खाणे फायदेशीर असते.
राजगिऱ्यातील कॅल्शिअम,फॉस्फरस दात मजबूत राखण्यास मदत करते.
राजगिरा हदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. कारण यामुळे कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.