भारतीय स्वयंपाकघरात रोज नाश्त्याला ब्रेड ऑम्लेट खाल्ले जाते. याला राष्ट्रीय नाश्ता म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण लवकर तयार होणारा नाश्ता आहे
जर तुम्ही नाश्त्याला रोज ब्रेड ऑम्लेट खाल्ल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो ते जाणून घ्या
ब्रेड ऑम्लेट खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत नाही. मात्र तुम्हाला ब्राउन ब्रेडचा वापर करायला हवा. अंड शिजलेले असले पाहिजे
अंड्यामध्ये व्हटॅमिन ए, व्हिटॅमीन डी, व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन ई, कॅल्शिअम, आयरन यांसारखे प्रथिने असतात.
ब्राउन ब्रेडमध्ये कार्बोहाइड्रेट, फायबर, प्रथिने, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन ई, फायबर, मॅग्नेशिअम यांसारखे प्रथिने असतात.
ब्रेड ऑम्लेट खाताना हे लक्षात ठेवा की ते मर्यादित प्रमाणात खावे अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते.
ज्या लोकांना ॲलर्जीची समस्या आहे त्यांनी अंड्याचे सेवन करु नये. यामुळे त्याच्या समस्या वाढू शकतात. तरी पण खायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
सेलिआक रोग असलेल्यांनी ब्राउन ब्रेड खाण्याचे टाळावे. यामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुटेनचे प्रमाण असते.