शरीर निरोगी ठेवण्यासाठी बिटाचा रस पिणे खूप फायदेशीर आहे. हे पिण्यासाठी खूप चविष्ट असते
जर तुम्ही बिटाच्या रसामध्ये ही गोष्ट मिसळून प्यायल्यास डोळे चांगले राहण्यास मदत होते.
गाजरमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी, पोटॅशिअम आणि फायबर हे गुणधर्म असतात
बिटामध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम, कॅल्शिअम यांसारखे गुणधर्म असतात
डोळे चांगले राहण्यासाठी बिटांच्या रसात गाजर मिसळून खाणे चांगले. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन ए असते
ज्या लोकांना हृद्याच्या संबंधित आजार आहेत त्यांनी बिटांच्या रसात गाजर मिसळून खाणे चांगले असते कारण त्यामध्ये पोटॅशिअम असते
बिटाचा रस आणि गाजर या दोन्हीमध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात आहे. व्हिटॅमीन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते
बिटाचा रस आणि गाजर या दोन्ही गोष्टी खाताना मर्यादित प्रमाणात खा नाहीतर आरोग्य बिघडू शकते.